मुंबई-दहिसर परिसर वाहतूककोंडी मुक्त होणार

मुंबई-दहिसर परिसर वाहतूककोंडी मुक्त होणार

मुंबई-दहिसर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी दहिसर-मीरा रोडदरम्यान रस्ता बांधण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित ५ किलोमीटर रस्त्यासाठी खर्च करण्याची तयारी एमएमआरडीएने दर्शवली असून, तसे पत्र मुंबई महापालिकेला दिले आहे. एमएमआरडीएने पत्र दिल्याने मुंबई-मीरा रोड परिसरातील वाहतूककोंडी फुटणार आहे. यासाठी १,८०० कोटींचा खर्च असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाक्यावर नेहमीच गर्दी असते. वाहनांमुळे गर्दी वाढत असल्याने मुंबई -मीरा रोड-भाईंदर दरम्यान वाहतूककोंडी होत असते. या ठिकाणची वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून हा ५ किमीचा रस्ता बांधण्यात येत आहे. यामधील सुमारे २ किमीचा रस्ता मुंबई महानगरपालिका बांधणार आहे. यासाठी सुमारे ७०० ते ७५० कोटींचा खर्च पालिका करणार असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

पालिकेच्या हद्दीबाहेरील खर्च ‘एमएमआरडीए’ करणार असून तसे पत्र पालिकेला दिले असल्याचे ते म्हणाले. मिरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीमधील ३ किमीच्या रस्त्याच्या कामात रहिवाशांच्या पुनर्वसनासह रस्तेबांधणीचे काम ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून केले जाणार आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in