Mumbai Local : कर्नाक पूल पाडकामासाठी रेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक सुरु; रेल्वे वेळापत्रकामध्ये पहा काय आहे बदल...

सीएसएमटी ते भायखळा या स्थानकांदरम्यान (Mumbai Local) लोकल सेवा २१ तास आणि मेल-एक्स्प्रेस वाहतूक २७ तास बंद करण्यात आली
Mumbai Local : कर्नाक पूल पाडकामासाठी रेल्वेचा २७ तासांचा मेगाब्लॉक सुरु; रेल्वे वेळापत्रकामध्ये पहा काय आहे बदल...

१५४ वर्षापेक्षा जुना कर्नाक पूल पाडण्यासाठी रेल्वे विभागाने २७ तासाचा (MegaBlock) सुरु करण्यात आला आहे. अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. पूल पाडण्याचे काम शनिवारी रात्री ११ वाजता सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सीएसएमटी ते भायखळा या स्थानकांदरम्यान लोकल सेवा २१ तास आणि मेल-एक्स्प्रेस वाहतूक २७ तास बंद करण्यात आली आहे.

हा मेगाब्लॉक सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी भायखळा, परळ, कुर्ला, दादर या स्थानकांतून ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा या मार्गावर लोकल धावणार आहेत. या फेऱ्यांची संख्या कमी असणार आहे. तसेच मध्य रेल्वेवरील ‘लोकल लाइन’, ‘फास्ट लाइन आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आहे, त्यामुळे पॉवर ब्लॉक घेतला आहे.

यातच मुलुंड ते ठाणे दरम्यान कोपरी पुलाचे सात गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवार व रविवार आणि रविवार-सोमवार मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील सहा मार्गिकांवर हा ब्लॉक असणार आहे.

पुणे-मुंबई मार्गासह मुंबईतून पुण्यामार्गे धावणाऱ्या ३६ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. ५७ रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे वेळापत्रक नीट तपासून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in