Mumbai : जुहू बीचवर पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू

बिर्ला लेनच्या मागे जुहू बीचवर ही घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तिघांचा शोध सुरू
Mumbai : जुहू बीचवर पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू
File PhotoANI

मुंबईमधील चेंबूर परिसरातील चार मुले आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास जुहू समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेली असून त्यातील तीन मुले बुडाल्याची माहिती आहे. चौपाटीवर चार मित्र फिरण्यासाठी आले होते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बिर्ला लेनच्या मागे जुहू बीचवर ही घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तिघांचा शोध सुरू आहे.

आनंद सिंग (21 वर्षे), कौस्तुभ गुप्ता (18 वर्षे) आणि प्रथम गुप्ता (16 वर्षे) यांचा बुडालेल्या मुलांमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, मुंबई महानगरपालिकेचे जीवरक्षक, स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली, मात्र अद्याप तीन मुले सापडलेली नाहीत. चेंबूर येथील मुले समुद्राकडे जात असताना तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. मात्र, ही चारही मुले त्यांच्या मदतीशिवाय समुद्रात गेल्याचे कळते.

.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in