Mumbai : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याला वाढती मागणी; कुलाब्यात संस्थांचा पुढाकार; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर

मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपयोग करणे शक्य आहे. यासाठी कुलाबा येथे सांडपाणी प्रकल्प राबविण्यात आला असून मलजल प्रक्रिया केंद्रातील ३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पातून १० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे.
Mumbai : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याला वाढती मागणी; कुलाब्यात संस्थांचा पुढाकार; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर
Mumbai : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याला वाढती मागणी; कुलाब्यात संस्थांचा पुढाकार; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर
Published on

मुंबई : मुंबईतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपयोग करणे शक्य आहे. यासाठी कुलाबा येथे सांडपाणी प्रकल्प राबविण्यात आला असून मलजल प्रक्रिया केंद्रातील ३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पातून १० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री केली जात आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी प्रति हजार लिटर हे १५ रुपये दराने विकणार आहे. कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्याची खरेदी करण्यासाठी कंपन्या पुढे आल्या असून या खासगी, निमशासकीय, शासकीय आस्थापनांना विक्री करण्याचा दर निश्चित केला आहे. हे पाणी खरेदी करण्यासाठी मागणी वाढू लागली आहे.

मुंबई मलनिःसारण प्रकल्प भाग २ अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे काम २०२० मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर या केंद्राची दैनदिन देखभाल करण्यासाठी पुढील १५ वर्षांच्या कालावधीसाठी सुएझ इंडिया प्रा. लि. कंपनीची निवड केली आहे. प्रकल्पाची क्षमता प्रति दिन ३७ दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यापैकी १० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया केली जाते. यातील सांडपाणी अधिक शुद्ध होऊन त्याचा पुनर्वापर पेयत्तर अर्थात पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी म्हणजेच बांधकाम, उद्याने, तसेच इतर सफाई कारणासाठी केला जाऊ शकतो.

मुंबई मेरीटाईम बोर्ड यांना समुद्रकिनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी २०२० मध्ये हाती घेतलेल्या टेट्रापॉड टाकण्याच्या कामांसाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रांमधून प्रक्रिया केलेले सांडपाणी त्यांच्या मागणीनुसार रुपये २१ प्रति १००० लिटर दराने पुरविले जाते. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

या संस्थांचा पुढाकार

कुलाबा मलजल प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्यावर प्रति किलो लिटर १२ रुपये खर्च येत आहे. त्यानुसार आता महापालिका प्रति किलोलीटर अर्थात एक हजार लिटर पाण्यासाठी १५ रुपये दर आकारण्याचे निश्चित केले आहे. यासाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्याच्या खरेदीसाठी एस. आर. एंटरप्राजेस ही संस्था पुढे आली आहे. एस.आर. एंटरप्राइजेस महिला बचत गटाने या केंद्रातून सुमारे ३० लाख लिटर प्रतिदिन इतके प्रक्रिया केलेले पाणी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in