मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ रजिस्ट्रार, परीक्षा संचालक मिळेना

विद्यापीठाने या पदावर तात्पुरती भरती केली आहे. मुंबई विद्यापीठात जूनमध्ये रवींद्र कुलकर्णी हे कुलगुरु म्हणून रुजू झाले
मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ रजिस्ट्रार, परीक्षा संचालक मिळेना
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठ हे जगातील नामांकित विद्यापीठ आहे. तरीही या विद्यापीठाला गेल्या वर्षभरापासून रजिस्ट्रार, परीक्षा संचालक व विविध विभागांना विभाग प्रमुख मिळत नसल्याचे जळजळीत वास्तव उघड झाले आहे.

सप्टेंबर २०२२ पासून ही सर्व पदे रिक्त आहेत. ही पदे सध्या तात्पुरत्या नेमणुकीने भरली जात असून त्यांच्याकडूनच कारभार हाकला जात आहे. विद्यापीठाने या पदांसाठी सहा इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तरीही त्यांना संचालक, परीक्षा संचालक आदींचा पदांसाठी इच्छुक व्यक्ती मिळत नाही. तर अन्य पदांसाठी अजूनही उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले नाही.

या पदावरील व्यक्ती विद्यापीठाच्या प्रशासन व शैक्षणिक कार्यक्रमांना जबाबदार असतात. सध्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करत असताना ही महत्वाची पदे रिक्त आहेत.

विद्यापीठाचे परीक्षा विभागाचा संचालक हे पद अत्यंत महत्वाचे आहे. या विभागाकडून विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. अनेकदा विविध परीक्षांच्या निकालाला विलंब होतो. गेल्या वेळी परीक्षेत विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने उत्तरपत्रिका भरल्याने अनेक परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यामुळे शेवटच्या परीक्षेच्या सत्रातही विलंब झाला.

विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासोबतच अनेक विभागांच्या विभागप्रमुखांची मुदत संपली. त्याचवेळी विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक विनोद पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विभागाचे रजिस्ट्रार बनले. त्यानंतर सुधीर पुराणिक हे मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार बनले. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते अजूनही रजेवर आहेत. त्यामुळे विद्यापीठाला अजूनही प्रशासकीय प्रमुख नाहीत.

विद्यापीठाने या पदावर तात्पुरती भरती केली आहे. मुंबई विद्यापीठात जूनमध्ये रवींद्र कुलकर्णी हे कुलगुरु म्हणून रुजू झाले. त्यानंतर आता रजिस्ट्रार व विभाग प्रमुखांच्या नियुक्तीची जाहिरात दिली. मुंबई विद्यापीठाने सहा उमेदवारांची यादी बनवली आहे. यात तीन विद्यापीठाचे अधिकारी आहेत. त्यात एक जण गणित विभागाचे शिक्षक तर दोघेजण हे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील शिक्षक आहेत. मुलाखतीत कोणीही सक्षम न वाटल्याने गेल्या महिन्यात पुन्हा जाहिरात काढली. आता ही निवड प्रक्रिया डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

विद्यापीठातील नेमणुकीत विलंब होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. विद्यापीठाचे अधिकारी जाणूनबुजून महत्वाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना विलंब करत आहेत, असे विद्यापीठाच्या सिनेटचे माजी सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले.

युवा सेनेचे (उबाठा) माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले की, विद्यापीठाला परीक्षा संचालक नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळवायला तीन महिने लागत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या उच्चशिक्षणावर होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in