मुंबईला आता अतिरिक्त १००० मेगावॉट वीज मिळणार

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा लिमिटेडचा ७ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०२६ अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईला आता अतिरिक्त १००० मेगावॉट वीज मिळणार

सध्याच्या विजेच्या वाढत्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईला आता अतिरिक्त १००० मेगावॉट वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालघर जिल्ह्यातील कुडूस ते मुंबई उपनगरातील आरे कॉलनी येथे ८८० किलोमीटर हायव्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिशन बसवण्याकरिता महाराष्ट्र कोस्टल झोन रेग्युलेटरी प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा लिमिटेडचा ७ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०२६ अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडी सरकारने मे महिन्यातच या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता, त्यानंतर प्राधिकरणाने ११ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीनंतर या प्रकल्पाला मान्यता दिली असून ८ सप्टेंबर रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेही सादर केलेल्या कागदपत्रांद्वारे या प्रकल्पाला मार्च २०२१मध्येच मान्यता दिली होती. अदानी इलेक्िट्रसिटी मुंबई इन्फ्रा २५ वर्षाच्या कालखंडाकरिता (२०४६ पर्यंत) स्वत:च्या मालकीचा १ हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारत आहे. ८० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाच्या विद्युतवाहिन्या साधारणपणे २० किलोमीटर जमिनीखालून बसवण्यात येणार आहेत. या विद्युतवाहिन्या वसई आणि कामण खाडीखालून येणार असून यामुळे सभोवतालच्या पर्यावरणाला तसेच समुद्री पर्यावरणाला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही, याची काळजी अदानी इलेक्िट्रसिटीकडून घेतली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in