गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचे पालिकेचे निर्देश

३१ ऑगस्ट रोजी लाडक्या गणराचे आगमन होणार असून लाखो भाविक बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत
गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचे पालिकेचे निर्देश

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची लगबग सुरु झाली आहे. तर मुंबई महापालिकाही गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी प्रत्येक वॉर्डात तीन असे २४ वॉर्डात १०० कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सोमवारी सहायक आयुक्तांना दिल्याचे उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.

३१ ऑगस्ट रोजी लाडक्या गणराचे आगमन होणार असून लाखो भाविक बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका व गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक सोमवारी संपन्न झाली. यंदा पीओपीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास तात्पुरती परवानगी दिली आहे. मात्र पुढील वर्षांपासून टप्याटप्याने पीओपीच्या मूर्तींचा वापर टाळा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंधांचे बंधन नसल्याचे संकेत देण्यात आल्याने यावर्षी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीला उपनगर गणोशोत्सव समन्वय समितीचे विनोद घोसाळकर, ‘लालबागचा राजा’ मंडळाचे सुधीर साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in