
मुंबई : ईडीच्या रडावर असलेल्या राष्ट्रवादीचे नेते, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तांतर आणि बदलत्या राजकीय घडामोडीमुळे तपास यंत्रणेना संभ्रमात पडली आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याची वल्गना करणारी ईडी आत मूग गिळून गप्प आहे. मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन.जे,जामादार यांच्यासमोर सुनावणी झाली.न्यायालयाने याचिकेची सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत तहकूब करताना मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले. या याचिकेवर न्यायमूर्ती एन.जे. जामादार यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाकडे वेळ मागून घेण्यात आला. मुश्रीफ यांच्याविरोधात पुरावे असल्याचा गाजावाजा करणाऱ्या ईडीने न्यायालयात नांगी टाकली आहे.