Narayan Rane : संजय राऊत पळपुटा; राऊतांनी केलेल्या आरोपांवर काय म्हणाले नारायण राणे?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना केले होते आव्हान
Narayan Rane : संजय राऊत पळपुटा; राऊतांनी केलेल्या आरोपांवर काय म्हणाले नारायण राणे?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते नारायण राणेंना (Narayan Rane) 'माझ्या नादी लागू नका. मी जर प्रकरणे बाहेर काढली तर तुम्ही ५० वर्षांसाठी तुरुंगात जाल.' असे आव्हान केले होते. यावर उत्तर देताना नारायण राणे चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले की, "संजय राऊतला मी पत्रकार मानत नाही. तो पळपुटा आहे." असा पलटवार त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, "माझ्याकडे कात्रणे असून मी असा वाचून विसरणाऱ्यातला नाही तर दखल घेणारा आहे. अतिशय वाईट स्वभाव आहे माझा. मी प्रत्येक वाक्य वाचतो. २६ डिसेंबरचा अग्रलेख मी जपून ठेवला आहे. मीही त्याच्यावर केस टाकणार, त्याला असा सोडणार नाही. मी कालपर्यंत गप्प होतो. तू आज मर्यादा उलांडली आहेस. तुझ्यासारखे असे किती आले आणि गेले. तू काय सांगतो आम्हाला लढायच्या गोष्टी रे. तुझी लायकी आहे का?" असा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना आव्हान केले होते. ते म्हणाले होते की, "नारायण राणेंनी माझ्या नादाला लागू नये. तुमची प्रकरणे बाहेर काढली तर तुम्ही ५० वर्षांसाठी तुरुंगात जाल. आधी तुमची राजवस्त्रे बाजूला ठेवा आणि मैदानात या. मग मी दाखवतो." असे आव्हान त्यांनी दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in