'नवशक्ति इफेक्ट ' रेतीबंदर येथे पालिका करणार क्रेनची व्यवस्था ३५० हून अधिक मंडळांना दिलासा

पालिकेच्या या निर्णयामुळे दादर, माहिम धारावीतील ३५० हून अधिक मंडळांना दिलासा मिळाला
'नवशक्ति इफेक्ट ' रेतीबंदर येथे पालिका करणार क्रेनची व्यवस्था ३५० हून अधिक मंडळांना दिलासा

मुंबई : माहीम रेतीबंदर येथे मुर्ती विसर्जनासाठी हजारो रुपये लूट करणाऱ्या खाजगी क्रेन मालकांना लगाम बसला आहे. मुर्ती विसर्जनासाठी हजारो रुपये घेत असल्याचे वृत्त दैनिक 'नवशक्ति'ने गुरुवारी प्रसिद्ध केले आणि मुंबई महापालिका ताबडतोब अॅक्शन मोडमध्ये आली. माहीम रेतीबंदर येथे मुर्ती विसर्जनासाठी कोणतेही शुल्क न आकारता क्रेनची व्यवस्था करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयामुळे दादर, माहिम धारावीतील ३५० हून अधिक मंडळांना दिलासा मिळाला आहे.

पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन

तसेच माहीम रेती बंदर या विसर्जन ठिकाणी धारावी, सायन, शाहू नगर येथील ३०० सार्वजनिक मंडळाकडून खाजगी क्रेन मालक विसर्जनासाठी १ ते दोन हजार रुपये शुल्क आकारत होते; मात्र दैनिक 'नवशक्ति'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाजगी क्रेन मालकाला थारा न देता महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्याचे आश्वासन देत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे ही स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.

त्वरित काम पूर्ण होणार

आगामी गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबरपर्यंत मुंबईत मोठ्याप्रमाणात साजरा केला जाणार आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या, अस्ताव्यस्त रस्त्यांवर पडलेले कचऱ्याचे ढीग, मार्गिकांवर लटकणाऱ्या वायर याबाबत तक्रार वजा मागणी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत समन्वय समितीने केली होती. समितीने केलेल्या मागणीला पालिका आयुक्तांनी प्रतिसाद देऊन मुंबईतील सर्वच विभागांना मागणी नुसार काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जी / उत्तर विभागातील समितीचे प्रतिनिधी गणेश गुप्ता, प्रमोद खाड्ये आणि महापालिका अधिकाऱ्यांनी दादर, माहीम आणि धारावी विभागात पाहणी केली. त्यानंतर धारावी येथील खड्डे बुजवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी, स्वच्छता इ. त्वरित केले जाईल, असे आश्वासन जी / उत्तर विभागाकडून देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in