Navneet Rana : उद्धव ठाकरेंच्या 'या' विधानाशी नवनीत राणा यांनी दर्शवली सहमती

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनी सहमती दर्शवली. पण, टीकादेखील केली.
Navneet Rana : उद्धव ठाकरेंच्या 'या' विधानाशी नवनीत राणा यांनी दर्शवली सहमती

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलतात. मात्र, एका विधानावर त्यांनी सहमती दर्शवली. उद्धव ठाकरे यांनी 'पुन्हा सत्ता आणून महिलेला मुख्यमंत्री करायचे आहे' असे विधान केल्यानंतर, या विधानाचे स्वागत करत नवनीत राणा म्हणाल्या की, 'तसे झाले तर अभिमानच वाटेल.' मात्र, ही एक गोष्ट सोडली तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकादेखील केली.

नवनीत राणा म्हणाल्या की, "महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला व्हावी हे शब्द उद्धव ठाकरे यांच्या मुखातून शोभत नाहीत. ज्यांना स्वतः मुख्यमंत्री होण्याची हौस आहे, ते दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवायचे स्वप्न कसे पाहू शकतात? त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आम्ही महिला खूप प्रतिभावान आहोत. पहिली महिला राष्ट्रपती आमच्याच जिल्ह्यातून झालेल्या असून मला या गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही ठाकरेंचे विधान गांभीर्याने घेत नाही. पण महिला मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in