नवाब मलिक यांनी तपासाच्या वेळी दोनदा जबाब बदलला

३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले
नवाब मलिक यांनी तपासाच्या वेळी दोनदा जबाब बदलला

मनीलाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी तपासाच्या वेळी दोनदा आपला जबाब बदलला, असा दावा करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.

ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येक वेळा मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेनेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी केला.

१४ सप्टेंबरला सुनावणी

गोवाला कंपाऊंड ही जमीन कोणतिही शहानिशा न करता मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांच्याकडून खरेदी केली असल्याचा दावाही केला. पॉवर ऑफ अँटर्नीवर असलेली स्वाक्षरी ही मुनीराची असल्याचे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसरीकडे, मुनीरा यांनी सही केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी निश्चित केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in