चारचाकी वाहन नोंदणीसाठी नवीन नंबर; एमएच-०१ ईआर नवी सिरीज, मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय

चारचाकी वाहनांची नवी ओळख निर्माण होणार आहे. याआधी एमएच-०१ ईएन हा नंबर कालबाह्य होत असून यापुढे एमएच-०१ ईआर या नंबरची मालिका सुरू होत आहे.‌
चारचाकी वाहन नोंदणीसाठी नवीन नंबर; एमएच-०१ ईआर नवी सिरीज, मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय
Published on

मुंबई : चारचाकी वाहनांची नवी ओळख निर्माण होणार आहे. याआधी एमएच-०१ ईएन हा नंबर कालबाह्य होत असून यापुढे एमएच-०१ ईआर या नंबरची मालिका सुरू होत आहे.‌ या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेत्तर वाहनांसाठी आरक्षित करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतर्गत विहित शुल्क आकारले जाणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्ष‍ित करावयाचा असेल, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांच्या नावे काढलेल्या विहित शुल्काच्या धनादेशासह गुरुवारी १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे सादर करावा. विहित शुल्क भरून नमुन्यातील अर्ज खिडकी क्रमांक ई-१८ वर मंगेश मोरे यांचेकडून प्राप्त करून घेता येईल.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, लिलाव पद्धतीचा त्याच दिवशी दुपारी २ वाजता अवलंब करून नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल. सदर आरक्षित केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता ३० दिवसांसाठी असते. या क्रमांकावर ३० दिवसांच्या आत वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. वाहन क्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची नोंद वाहनाच्या डेटा एंट्रीच्या वेळी वाहन ४.० प्रणालीमध्ये घेतल्यास, त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्राप्त होतो, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य)चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in