
काल शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिवसंवाद यात्रेनिमित्त औरंगाबादमधील महालगाव येथे गेले होते. यावेळी सभेसमोर सुरु असलेल्या रमाबाई आंबेडकर यांच्या जंयतीचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये डीजेच्या आवाजावरून मोठा गोंधळ उडाला. तर, ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचा दावा केला. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर कडाडून टीका केली.
भाजप नेते निलेश राणेंनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, "आदित्य ठाकरेसारखा बोगस, भंपक माणूस महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. स्वतःच्या लोकांना दगड मारायला लावून दगडफेकीचा ड्रामा तयार केला. झेड प्लस संरक्षणासाठी ही नाटके केली." असे म्हणत टिका केली.
हेही वाचा :
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला झालाच नाही; काय म्हणाले पोलीस अधिकारी?
पुढे ते म्हणाले की, "अंबादास दानवेंच्या जिल्ह्यामध्ये त्यांचाच नेता दगड खातो, याची त्यांना लाज वाटली पाहिजे. खरंतर दानवेंनी राजीनामा द्यायला हवा. बाळासाहेब ठाकरे जर वरून पाहत असतील की आपला नातू दगडी खातो आहे, तर ते वरून तुम्हाला चप्पला फेकून मारतील. आदित्य ठाकरे आता दगडे खात आहेत, खोटे बोलायचे थांबव नाहीतर लोकांच्या चपला खाशील" असे म्हणत टीका केली.