कसाबप्रमाणे राहुल गांधींवर...; भाजप नेते नितेश राणेंनी केली 'ही' मागणी

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींवर झालेल्या कारवाईचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असताना भाजप नेते नितेश राणेंनी केली मागणी
कसाबप्रमाणे राहुल गांधींवर...; भाजप नेते नितेश राणेंनी केली 'ही' मागणी
Published on

"राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्यांना भारताबाहेर काढून पाकिस्तानला पाठवून द्या." अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आमदारकी रद्द केल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया येत असताना नितेश राणेंनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. ते पुढे म्हणाले की, "ओबीसी समुदायाच्या नावाने चुकीची विधाने करता. त्यानंतर संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यानंतर मग भाजपच्या नावाने कशाला बोंबा मारता?" असा सवाल नितेश राणेंनी यावेळी केला आहे.

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची डुक्करे कापायची. म्हणजे त्या जागेवरून हिंदू निघून जातील, असा प्रकार सध्या राज्यात सुरू असून सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू आहे." असा दावा त्यांनी यावेळेस केला. ते पुढे म्हणाले की, "आमची लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी आहे. सर्व सामान्यांना त्याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्यान व प्रबोधनाची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण मुंब्र्याच्या जित्तूदिन (जितेंद्र आव्हाड) आणि अबू आझमी हे लव्ह जिहादची आकडेवारी खोटी असल्याचा असल्याचा आरोप करत आहेत." असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in