
शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या मागणीनुसार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर शिवसेना आमदारांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीचे ४८ तासांत उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाणार आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नोटिशीनंतर शिंदे गटातील आमदार न्यायालयात जाण्याची शक्यता असून झिरवळ यांच्या नोटिशीला आव्हान देण्याची शक्यता आहे