नवमीनिमित्त 'चांदिवलीच्या अंबाई'मातेच्या गोंधळाचे आयोजन

चांदिवली नगरीत उत्साहाचे व आनंदाचे एक एक क्षण आपण सगळे अनुभवत आहोत.
नवमीनिमित्त 'चांदिवलीच्या अंबाई'मातेच्या गोंधळाचे आयोजन

मुंबई : गेल्या १५ वर्षाची गौरवशाली परंपरा चालू ठेवतानाच चांदिवली म्हाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील धार्मिक संस्कृतीचा व आधुनिक विचारसरणीचा अवलंब करताना आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान स्थान असलेल्या 'चांदिवलीची अंबाई' गणेश मैदान येथे विराजमान झाली आहे. या आदिशक्तीच्या आगमनाने आणि तीचा रोज होणाऱ्या सायंकाळच्या जागराने अवघ्या चांदिवली नगरीत उत्साहाचे व आनंदाचे एक एक क्षण आपण सगळे अनुभवत आहोत.

या क्षणांचा अत्युच्य बिंदू म्हणजे रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी होणारा देवीच्या अष्टमीचा होम आणि सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी नवमीला होणारा अंबाई मातेचा गोंधळ. आपल्या संपुर्ण परिवारासह या धार्मीक विधीच्या दिवशी श्री अंबाई मातेचे दर्शन व कृपाशीर्वाद घेण्यासाठी आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित राहून आपल्या या उत्सवाची व हिंदू संस्कृतीची शान वाढवावी, अशी विनंती चांदिवली म्हाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने अध्यक्ष, राजेंद्र क्षीरसागर, कार्याध्यक्ष कौस्तुभ बेटकर, महासचिव भालचंद्र काबाळे, महिला अध्यक्षा सपना आपिष्ट, खजिनदार मारुती सांळुखे यांजकडून करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in