काँग्रेसचे माजी मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला;राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू

भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते
काँग्रेसचे माजी मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला;राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू

मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी रविवारी गेले होते. शेख यांच्याविरोधात २०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेख हे फडणवीस यांना भेटण्यासाठी गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोठी कारवाई होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in