पश्चिम रेल्वेवर महिन्या भरात आणखी एका एसी लोकलची भर पडणार

सातपैकी चार लोकल प्रवाशांच्या सेवेत असून, दोन गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहेत
पश्चिम रेल्वेवर महिन्या भरात आणखी एका एसी लोकलची भर पडणार

मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरही आणखी एका एसी लोकलची भर पडणार आहे. येत्या एका महिन्यात ही लोकल मुंबईत दाखल होणार असून, सध्या चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच (डबा) कारखान्यात या लोकलची बांधणी होत आहे. दरम्यान, ही लोकल दाखल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण आठ एसी लोकलचा भरणा होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात वातानुकूलित गाड्या आहेत. सातपैकी चार लोकल प्रवाशांच्या सेवेत असून, दोन गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहेत. आता आणखी एका वातानुकूलित लोकलची तांत्रिक चाचणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या महिनाअखेरीस आठवी वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ही लोकल मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याच्या काही चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतरच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून नवीन वातानुकूलित लोकलच चालविणे योग्य की, नवीन फेऱ्यांचा समावेश करावा का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in