मुंबई : मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने भूशास्त्र विषयावर “चला डोक्यात दगड भरूया” हे एक आगळंवेगळं प्रदर्शन धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात रविवार ५ नोव्हेंबरला आयोजित केले होते. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते उदाघटन झाले. यावेळी जुन्नरकर यांनी मार्गदर्शन केले.
कोल्हापूरच्या विवेकानंद महाविदयालयातील डॅा. अभिजीत पाटील व गोपाळ कृष्ण गोखले विद्यालयातील डॅा. योगिता पाटील यांच्या वैयक्तिक संशोधनातून जमवलेले खडक, खनिजे आणि जीवाश्म यांच्या विविध नमुन्यांचा ज्ञानसंग्रह सर्वसामांन्यांसाठी या प्रदर्शनाद्वारे खुला केला होता. पुस्तकापलिडचा भूगोल मुलांना कळावा आणि त्यातील संशोधनाच्या संधी मुलांना व पालकांना कळवीत हा संस्थेचा हे प्रदर्शन भरवण्यामागचा हेतू होता. मंबईतल्या विविध शाळांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद देउन हा उपक्रम यशस्वी केला. बालमोहन विद्यामंदीर, सरस्वती विद्यामंदीर, गोरोगावर शाळा, डी एस हायस्कूल, एस, एस हायस्कूल, विद्यानिधी विद्यालय आणि इतर शाळांनी या उपक्रमांत भाग घेतला.