Aryan khan case : आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचा कोर्टाने दिला आदेश

आर्यन खानला गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती
Aryan khan case : आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचा कोर्टाने दिला आदेश
ANI

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर आर्यन खानने 1 जुलै रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये त्याने पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती. आर्यन खानला गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आर्यनला दीड महिन्यापूर्वी या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. त्यानंतर आर्यन खानने पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली, त्यानंतर न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. अखेर आज विशेष न्यायालयाने आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश एनसीबीला दिले. पुरेशा पुराव्याअभावी एनसीबीने आर्यन खान आणि इतर पाच जणांना क्लीन चिट दिली. आर्यन खानने जामिनावर कोर्टात पासपोर्ट जमा केला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in