मुंबई महापालिकेच्या शाळांना पालकांची पसंती

मुंबई महापालिकेच्या शाळांना पालकांची पसंती

मोफत व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. १४ एप्रिलपासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत १५ दिवसांत तब्बल ३५ हजार विद्यार्थी वाढले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत एक लाख नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे लक्ष्य केल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले. पालकांचा पालिका शाळांकडे कल वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ३३ हजारांवर गेली आहे.

पालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थी यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असते. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार असून, पालिका शाळांत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत व दर्जेदार शिक्षण देण्यावर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा जोर आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जात असून, २७ शालेय वस्तू मोफत देण्यात येतात. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल केल्याने विद्यार्थी-पालकांचा कल वाढला आहे. व्हर्च्युअल क्लासरूम, मोफत टॅब, मोफत ‘बेस्ट’ बस प्रवास आदी सुविधा दिल्या जातात. जागतिक स्पर्धेत पालिकेचे विद्यार्थी टिकावेत, यासाठी केंब्रीज बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाकाळातील दोन वर्षांत ३० हजार विद्यार्थी वाढले आहेत, तर गेल्या १५ दिवसांत ३५ हजार विद्यार्थी वाढले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in