कुलाब्यातील उद्यान 'फक्त महिलांसाठी' राखीव ठेवा उद्यानाला 'स्व. सुषमा स्वराज वुमेन्स पार्क' नाव द्या; भाजपचे पालिका आयुक्तांना पत्र

शहरे ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्याचे नियोजन केले जात नसल्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले आहे.
कुलाब्यातील उद्यान 'फक्त महिलांसाठी' राखीव ठेवा उद्यानाला 'स्व. सुषमा स्वराज वुमेन्स पार्क' नाव द्या; भाजपचे पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई : कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेला (बीएमसी) पत्र लिहून कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील दीपक जोग चौकातील उद्यान फक्त महिलांसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी पालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. तसेच उद्यानाला 'स्वर्गीय सुषमा स्वराज वुमेन्स पार्क' असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

शहरे ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्याचे नियोजन केले जात नसल्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले आहे. "जर आपल्याला खऱ्या अर्थाने शाश्वत शहरे बनवायची असतील तर महिलांसाठी खुल्या जागा निश्चित करण्याचा विचार केला पाहिजे. पुतळे, रस्ते आणि उद्याने यांची नावे हि ओळखीची भावना निर्माण करतात. तसेच त्यातून व्यक्ती आणि गटांचे कार्य देखील अधोरेखित होते. या पार्श्‍वभूमीवर, महिलांसाठी खुल्या जागा राखीव ठेवण्याची नितांत गरज आहे,” असे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

सध्या शहरातील एकही उद्यान फक्त महिलांसाठी राखीव नाही. लोकल रेल्वेमध्ये महिलांसाठी राखीव बोगी, बेस्ट बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा इत्यादी असल्या तरी, मुंबईमध्ये महिलांसाठी कोणतीही उद्याने राखीव नाहीत,” असेही पुढे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in