विश्‍वस्तांमध्ये राजकीय, गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती नको - हायकोर्ट

एकविरा देवी ट्रस्ट विश्‍वस्त निवडणूक
विश्‍वस्तांमध्ये राजकीय, गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती नको - हायकोर्ट

मुंबई : राज्यातील देवस्थानंच्या ट्रस्ट मध्ये राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची विश्‍वस्त म्हणून वर्णी लागत असल्याने उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. भक्तांमधून निवडण्यात येणाऱ्या विश्‍वस्तांमध्ये राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची नियुक्ती थांबली पाहिजे, असे स्पष्ट करताना न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश फिरोज पूनीवाला यांच्या खंडपीठाने एकविरा देवी देवस्थानच्या निवडणूकीत भक्तांमधून निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करा, ज्या उमेदवाराचे राजकीय हितसंबध तसेच गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असेल, तर ते अर्ज बाद करा, असा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांला दिला. न्यायालयाने या निवडणुकीसाठी प्रोथोनोटीरी (रजिस्टार)ची नियुक्ती केली आहे.

कार्ला-लोणावळा येथील एकविरा देवी देवस्थानच्या विश्‍वस्त निवडणुकीचा मुद्दा उच्च न्यायालयात पोहचला आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पाडत आहे. ९ विश्‍वस्तांपैकी ७ विश्‍वस्तांची निवडूक पार पडल्यानंतर भक्तांमधून निवड करण्यात येणाऱ्या दोन विश्‍वस्तांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जांत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या उमेदवारांचे अर्ज असल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रिया थांबवा, अशी विनंती करणारी याचिका अ‍ॅड. चेतन रमेश पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश फिरोज पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीच्या वेळी १९ ऑगस्टला होणार्‍या निवडणुकीला खंडपीठाने स्थगिती दिली होती. गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप तसेच साम-दाम -दंडांबरोबरच आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्तांमध्ये राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची वर्णी लागत असल्याने चिंता व्यक्त केली. या दोन विश्‍वस्तांच्या निवडणुकीत राजकिय तसेच गुन्हेगारी पार्श्‍वभुमी असलेल्या उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद करा, असा आदेशच खंडपीठने दिला.

न्यायालय म्हणते

-या ट्रस्टच्या निवडणुकीत भाविकांमधून दाखल झालेल्या अर्जांची छाननी करा. त्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असेल अथवा एखादा गुन्हा दाखल असेल. तसेच उमेदावार राजकीय पक्षाशी अथवा नातेवाईकांचा राजकिय पक्षाशी संबंध असल्यास अशा उमेदवाराचा अर्ज छाननी प्रकियेत बाद करा, असा आदेशच खंडपीठाने दिला.

-देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्तांमध्ये राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींची वर्णी लागते हे दुदैवी आहे.

-ट्रस्टचे राजकीयकरण थांबविले पाहिजे. खरे भक्त या निवडणुकीत विश्‍वस्त म्हणून निवडून येणे गरजेचे आहे.

-निवडणूक प्रकियेला ग्रामीण पोलिसांनी सहकार्य करावे.

- निवडणूक अधिकारी म्हणून प्रोथोनोटीरी ( रजिस्टार) ची नियुक्जही

- निवडणूक प्रक्रियेत पारदर्शक्ता येण्यासाठी सर्व माहिती प्रसिद्ध करावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in