बीडीडी चाळीतील पोलीसांना बांधकाम दराने घरे मिळणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीडीडी चाळीतील पोलीसांना बांधकाम दराने घरे मिळणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नायगाव, एन. एम. जोशी आणि वरळी येथील बीडीडी चाळींमध्ये पुनर्विकासानंतर तयार होणाऱ्या घरांपैकी काही घरे येथे २०११ पूर्वीपासून राहणाऱ्या पोलीसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने द्यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संबंधितांना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बुधवारी बीडीडी चाळ संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. तर २०११ पूर्वीपासून पोलीस निवासस्थानात राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम खर्चात ही घरे देण्यात येतील, असे गृहनिर्माण मंत्र डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले.

बीडीडी चाळीत अनेक वर्षांपासून रहिवासी राहत आहेत. या चाळींचा पुनर्विकास ही एक महत्वाकांक्षी योजना असून हे काम पुढे न्यायचे आहे. मात्र, पुनर्विकास करताना स्थानिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्यात यावा. या भागात उपलब्ध असलेल्या इतर घराच्या बाजार भावाच्या किंमतींपेक्षा कमी दराने त्यांना घरे मिळावीत, यासाठी गृहनिर्माण विभागाने विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बीडीडी चाळीत सुमारे २९०० घरे ही पोलीस सेवा निवासस्थाने आहेत. या पैकी ७०० पोलीस निवासस्थाने ही बीडीडी प्रकल्पात असतील तर उर्वरित २२०० घरे ही माहिम, वरळी ते दादर या परिसरात पोलीस सेवा वसाहतीसाठी दिली जातील, अशी माहिती डॉ. आव्हाड यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in