नैसर्गिक आपत्तीत मृत्यूनंतर मदतीचे धोरण कागदावरच

चार ते पाच वर्षांपासून हा प्रस्ताव आहे
नैसर्गिक आपत्तीत मृत्यूनंतर मदतीचे धोरण कागदावरच
Published on

मुंबई : भूकंप, आगीत होरपळून मृत्यू, समुद्रात बुडून मृत्यू, झाड अंगावर पडून मृत्यू अशा नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धोरण तयार करण्यात आले होते; मात्र आजही धोरण कागदावरच असल्याने माजी नगरसेवकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच धोरणाची वेळीच अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

भूकंप, आग, पूर यासह समुद्रात बुडणे, नाल्यात व मृत्यू मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, झाड अंगावर कोसळून मृत्यू किंवा जखमी झाल्यास कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने धोरण तयार करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. याबाबतचा प्रस्ताव नोव्हेंबर २०१९ मध्ये गटनेत्यांच्या व सभागृहाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यावर तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नैसर्गिक आपत्तीसह इतर दुर्घटनांमधील मृत्यू किंवा जखमींना मदत देण्याचे धोरण बनवण्याचे जाहीर केले होते. दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळून, समुद्रात बुडून अनेकांचे मृत्यू होतात. आर्थिक मदतीचे धोरण नसल्याने त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा प्रस्ताव अद्याप कागदावरच आहे.

logo
marathi.freepressjournal.in