शेअर बाजारात ‘झटपट’ सेटलमेंट -२०२४ पासून लागू करण्याची तयारी

भारतातील वित्त क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे
शेअर बाजारात ‘झटपट’ सेटलमेंट -२०२४ पासून लागू करण्याची तयारी
Published on

मुंबई : शेअर्सची खरेदी विक्री करताना डिमॅट खात्यात शेअर्स डेबिट व क्रेडिट होण्यासाठी सध्या दोन दिवस थांबावे लागणार नाही. पुढील वर्षीपासून अवघ्या तासाभरात शेअर्स जमा होतील किंवा विकल्यास पैसे जमा होतील. त्यानंतर सेबी ऑक्टोबर २०२४ पासून बाजारात ‘झटपट’ (इन्स्टंट) सेटलमेंट पद्धत लागू करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे शेअर विकल्यावर तात्काळ पैसे जमा होतील. यातून भारतातील वित्त क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.

सूत्रांनी सांगितले की, शेअर बाजारात ‘झटपट’ (इन्स्टंट) सेटलमेंट पद्धत लागू करण्याबाबत जुलै २०२३ मध्ये सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी-बुच यांनी याबाबतचे संकेत दिले होते. शेअर बाजारात इन्स्टंट सेटलमेंट व्यवहार होण्याचा दिवस दूर नाही. ही यंत्रणा लागू करण्यासाठी सेबी वेगवेगळ्या भागधारकांशी चर्चा करत आहे.

सध्या देशात ‘टी+१’ सेटलमेंट पद्धत आहे. गुंतवणूकदार कोणता शेअर खरेदी करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या डिमॅट खात्यात शेअर क्रेडिट केला जातो, तर शेअर विकल्यानंतर २४ ते ३६ तासांत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. पैशांशिवाय कोणताही व्यवहार करू शकत नाही. सेबी मार्च २०२४ पासून व्यवहारानंतर एका तासात सेटलमेंट करू शकते, तर ऑक्टोबर २०२४ नंतर ‘झटपट’ सेटलमेंट लागू होणार आहे.

स्टॉक एक्स्चेंज काही कालावधी आवश्यक

मार्च २०२४ पासून एका तासात सेटलमेंट होईल. मात्र, स्टॉक एक्स्चेंज व क्लीअरिंग कॉर्पोरेशनला ‘झटपट’ सेटलमेंटसाठीची तयारी करायला काही वेळ हवा आहे. कारण त्यांना आपली यंत्रणा सुधारायची आहे.

logo
marathi.freepressjournal.in