क्यूआर कोड : आधुनिक काळातील यशाची गुरुकिल्ली!

शिक्षक, कर्मचाऱ्यांचा ‘डीपी’ स्कॅन करून मिळणार शाळेत प्रवेश
क्यूआर कोड : आधुनिक काळातील यशाची गुरुकिल्ली!

मोबाईल युगात व्हॉट्सअॅप लोकांची गरज झाली असून आजच्या युगात फारच उपयुक्त ठरत आहे. याच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आता मुलाचे अॅडमिशन आता सहज शक्य होणार आहे. पालिका शाळांतील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी आता व्हॉट्सअॅपवर ‘मिशन अॅडमिशन’ असा ठेवणे आवश्यक आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवेशापासून सगळी अपडेट मिळणार आहे.

मिशन अँडमिशन अंतर्गत २०२२-२३ मध्ये एक लाख नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे सद्यस्थितीत ४ लाख विद्यार्थी पालिका शाळेत शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावणे यासाठी दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांना २७ शालेय मोफत वस्तूंचे वाटप करण्यात येते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती अशा आठ प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका शाळांचे नामकरण आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पालिका शाळेतील विद्यार्थीसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून ‘मिशन अ‍ॅडमिशन’ मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये पहिल्याच वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या सुमारे सवा लाखाने वाढून चार लाखांवर पोहोचली आहे.

पालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाडीतील तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांचे प्रवेश ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये करण्याची जबाबदारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, विभाग निरीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

अशी होणार कार्यवाही...

महापालिका मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी तीन प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये पाल्याचे नाव, पालकांचा मोबाईल क्रमांक, हव्या असलेल्या प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता, प्रवेशाचे माध्यम इत्यादी बाबींचा समावेश असेल. यामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित पाल्याच्या प्रवेशाबाबतची माहिती जमा होईल व ती दररोज संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांना कळवण्यात येईल. या माहितीच्या आधारे मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पाल्याचा प्रवेश मुंबई पब्लिक स्कूलमध्ये करून घेण्यात येईल.

असे मिळणार अ‍ॅडमिशन

- पालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक, कर्मचारी, अधिकारी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर ठेवतील.

- यावर असलेल्या क्यूआर कोडवर स्कॅन करून पालकांना प्रवेशासाठी मूलभूत माहिती भरून प्रवेश घेता येईल.

- शिवाय http://bit.ly/BMC_MISSITION_ADMISSION_2023-24 या लिंकवर पालकांना पालिका शाळेत प्रवेश घेता येईल.

- शिवाय हेल्पलाइन म्हणून ७७७७०२५५५७ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत मदत मिळेल.

पटसंख्या एक लाखांनी वाढीचे उद्दीष्ट

‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढीचा आलेख उंचावत असून यंदा ‘मिशन ऍडमिशन : एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. तर येत्या ५ ते ३० एप्रिल पर्यंतच्या कालावधी दरम्यान पटनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या पटनोंदणी मोहिमेत मागील वर्षाच्या पटसंख्येच्या तुलनेत एक लाख वाढीव प्रवेश देण्याचे उद्दिष्ट्य निर्धारित करण्यात आले आहे.

असे करा अॅडमिशन

- मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी तीन प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये पाल्याचे नाव, पालकांचा मोबाईल क्रमांक, प्रवेशाचे ठिकाण, प्रवेशाची इयत्ता व प्रवेशाचे माध्यम इत्यादी बाबींचा समावेश आहे.

- याद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे संबंधित पाल्याच्या प्रवेशाची माहिती परिरक्षित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून पालकांना शाळा प्रवेशासाठी मुलभूत माहिती भरून प्रवेश घेता येईल.

- तसेच http://bit.ly/bmc_mission_admission २०२३-२४ या लिंकवर क्लिक करून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पाल्यांचा प्रवेश निश्चित करता येईल. याखेरीस शाळा प्रवेशासाठी ७७७७-०२५-५५७५ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

- कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ या वेळेत व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे शाळा प्रवेशाची माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in