राहुल नार्वेकर सर्वांना समान न्याय देतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भाजपकडे ११५ आणि आमच्याकडे ५० आमदार असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला
राहुल नार्वेकर सर्वांना समान न्याय देतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ॲड. राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देतील, असा विश्वास व्यक्त करत विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच नार्वेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपकडे ११५ आणि आमच्याकडे ५० आमदार असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मला काहीही नको होते, मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नव्हती. मात्र, भाजपने माझा सन्मान केला. माझ्या वैचारिक भूमिकेला पाठींबा दिला. भाजपचा हा निर्णय डोळ्यात अंजन घालणारा आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्यांनी ज्यांनी या अध्यक्षपदावर कार्य केले आहे, त्यांना देशपातळीवर नावाजले गेले. त्यामुळे विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळे महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली आहे. ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचाविण्याचे कार्य करतील. हा एक ऐतिहासिक क्षण असून या सभागृहात शेतकरी बांधव, महिला, सामान्य नागरीक यांचे हक्क, अधिकार जोपासले जातील. विकासासाठी काम करताना दोन्ही चाके समांतर सुरू राहतील. कायद्यासमोर सर्व समान म्हणून आपण कार्य करावे. हे सरकार पारदर्शकपणे कार्य करेल. सभागृहात कोणत्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही, वेळप्रसंगी समज देऊन योग्य मार्गदर्शन आपण कराल, अशी अपेक्षा ही शिंदे यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in