यूटीएस ढेपाळल्याने रेल्वे प्रवासी वैतागले

बँक, यूपीआय, क्यूआर कोड व एटीव्हीएम आदींवर हे ॲॅप चालत नव्हते
यूटीएस ढेपाळल्याने रेल्वे प्रवासी वैतागले

मुंबई : ऑनलाईन रेल्वे तिकीटासाठी वापरण्यात येणारे यूटीएस ॲॅप सोमवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत बंद पडल्याने प्रवासी वैतागले. या ॲॅपमध्ये पैसे भरण्याचे सर्वच मार्ग बंद झाल्याने प्रवासी संतापले होते. बँक, यूपीआय, क्यूआर कोड व एटीव्हीएम आदींवर हे ॲॅप चालत नव्हते.

पेमेंट करणाऱ्या सर्व्हरचे प्रॉब्लेम झाल्याने प्रवाशांना डिजीटल पेमेंट करता येत नव्हते. ऐन गर्दीच्या वेळेस हा प्रकार घडल्याने त्यांचा संताप झाला होता.

प. रेल्वेने सांगितले की, पेमेंट गेटवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बँक, यूपीआय, क्यूआर कोड आदी प्रकारांनी तिकीट काढता येत नव्हते. तर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूटीएस ॲॅप व रेल्वे खिडक्यांवरील तिकीट यंत्रणा चालत होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे एटीव्हीएम मशीन्स बंद होती.

ऐन गर्दीच्या वेळी प्रवासाचा त्रास त्यात तिकीट मिळत नसल्याचे त्यांची चिडचीड झाली. या तांत्रिक अडचणींचा तपास रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in