शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी रामलीला कार्यक्रमाला आडकाठी

रोज एक एक पक्ष फुटत असून, त्यांची वेगवेगळी दुकाने सुरू झाली आहेत.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी रामलीला कार्यक्रमाला आडकाठी

मुंबई : आझाद मैदानात गेल्या पन्नास वर्षांची परंपरा असलेला रामलीला कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्यासाठी एक दिवस आधीच संपवण्यास किंवा शेवटच्या दिवशी कुठे तरी रामलीला आयोजित करण्यास मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदीप शुक्ला यांनी दिली.

रामलीला हा श्रद्धेचा विषय आहे. स्वत:ला रामभक्त आणि हिंदुत्ववादी सरकार म्हणवून घेणाऱ्यांकडूनच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमाला आडकाठी आणली जात आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे. असे सांगत शुक्ला म्हणाले , राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हिंदू लोकांच्या भावना दुखावून रामलीलेची वर्षानुवर्षे चाललेली परंपरा खंडित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री लोढा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातोय.

हिंदू धर्माचा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. सलग नऊ दिवस मोठ्या आनंदात भक्तिभावाने हा रामलीला कार्यक्रम साजरा केला जातो. शिंदे गटाचा दसरा मेळावा या मैदानात घेणार आहे. त्यामुळे येथील रामलीला कार्यक्रम एक दिवस अगोदरच संपवा किंवा इतरत्र घ्या, अशा सूचना मंडळ आणि आयोजकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयोजकांनी काँग्रेस पक्षाकडे धाव घेतली आहे. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदीप शुक्ला यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कायदेशीर मार्गाने न्याय मागणार असल्याचे सांगितले.

रोज एक एक पक्ष फुटत असून, त्यांची वेगवेगळी दुकाने सुरू झाली आहेत. जनतेच्या व अन्यायग्रस्त आंदोलन करणाऱ्या जनतेच्या प्रश्नावर विचार करण्यास यांना वेळ नाही; मात्र राजकीय पक्षाचा मेळावा, शिबिर, अधिवेशन आदी विविध कार्यक्रम घेण्यास लोकप्रतिनिधींना वेळ आहे. रामलीला कार्यक्रम महत्वाचा की आमच्या गटाचा दसरा मेळावा महत्वाचा याकडे गांभीर्याने लक्ष न देता मनमानी कारभार करणाऱ्या या सरकारला जनता व आम्ही आंदोलनकर्ते मतपेटीतून धडा शिकवणार, असा इशारा मैदानात आंदोलन करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याने दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in