मुंबईत रंगला बीच फेस्टिवल

मुंबईसारख्या गर्दीने भरलेल्या शहरात, समुद्रकिनारी राहून शांतता व सौंदर्य अनुभवण्याची संधी सनटेकने उपलब्ध केली आहे.
मुंबईत रंगला बीच फेस्टिवल

मुंबई : मुंबईत सनटेक रियल्टीतर्फे सर्वात मोठ्या बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध जीवनशैली प्रदान करणाऱ्या बीचफ्रंट डेस्टिनेशनच्या या सोहळ्यात सुनिधी चौहान आणि अमित त्रिवेदी यासारख्या प्रसिद्ध कलाकारांनी चार चाँग लावले. या दोनदिवसीय फेस्टिव्हलमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट, खाद्यपदार्थ, मनोरंजन आणि मौजमजेसह अनेक गोष्टींची रेलचेल होती. संगीत आणि आनंद यांचा मिलाफ असलेल्या या सोहळ्याने हजारो उपस्थितांची मने जिंकली. मुंबईसारख्या गर्दीने भरलेल्या शहरात, समुद्रकिनारी राहून शांतता व सौंदर्य अनुभवण्याची संधी सनटेकने उपलब्ध केली आहे. याठिकाणी अनेक फन झोन उभारण्यात आले होते, त्याठिकाणी मनोसोक्त मौजमजा करत लोकांनी आपले निर्धास्त बालपण पुन्हा एकदा जगून घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in