अखेरच्या दिवशी २०७ हकरती सूचना प्राप्त

 अखेरच्या दिवशी २०७  हकरती सूचना प्राप्त

प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. १ ते ६ जूनपर्यंत हरकती सूचना पाठवा, पालिकेच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला असून १ ते ५ जूनपर्यंत फक्त २५ हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. परंतु सोमवारी अखेरच्या दिवशी २०७ हकरती सूचना प्राप्त झाल्याचे पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे एकूण २३२ हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, मुंबईकरांनी हरकती सूचना पाठवल्या असून विचार करुन अंतिम प्रभाग सोडत १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

३१ मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर लोकांच्या हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. १ ते ६ जूनपर्यंत हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते.

सोमवारी अखेरच्या दिवशी २०७ हरकती सूचना प्राप्त झाल्याने ६ दिवसांत २३२ हरकती सूचना प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यंदा एकूण २८८ जागांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in