मुंबई महापालिकेचे जलवाहिन्या बदलण्याचे व दुरुस्तीचे काम सुरु

मुंबई महापालिकेचे जलवाहिन्या बदलण्याचे व दुरुस्तीचे काम सुरु

दूषित पाणी, गळती रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाने ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलणे व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पूर्व उपनगरातील कुर्ला ते मुलुंड परिसरातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला असून या कामासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पूर्व व पश्चिम उपनगरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा पाढा माजी नगरसेवकांनी स्थायी समिती व सभागृहात अनेक वेळा वाचला होता. उपनगरात झोपडपट्ट्या असून या ठिकाणी दूषित पाण्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर जलवाहिन्या बदलणे व दुरुस्तीच्या निर्णय जल विभागाने घेतला आहे. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, या समस्यांतून उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in