धुळमुक्तीसाठी रस्तेसफाई ;तीन दिवसांत १५४ किमी रस्ते धुलाई

धुळमुक्तीसाठी रस्तेसफाई ;तीन दिवसांत १५४ किमी रस्ते धुलाई

सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत

मुंबई : प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी रस्ते धुण्यास सुरुवात केली आहे. रविवारी ५४ किलोमीटर लांबीचे रस्ते २४ टँकर मधील पाण्याचा वापर करून जेट मशीन, फायर एक्स व अन्य यंत्रणेद्वारे धूळ मुक्त करण्यात आले. ३ ते ५ नोव्हेंबर या तीन दिवसांत १५४ किमी लांब रस्त्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. दरम्यान, ज्या विभागात हवा गुणवत्ता निर्देशांक अधिक निदर्शनास आला आहे, त्या ठिकाणी मिस्टिंग मशीनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात येत आहे तर, धुळीचे प्रमाण अत्याधिक असलेल्या रस्त्यांवर ब्रशिंग करून त्या ठिकाणी जेट मशीनद्वारे पाणी फवारण्यात येत आहे.

सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. एकूण ३५७ रस्ते व ६७६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. याकरिता दैनंदिन एकूण १२१ टँकरद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. महानगरपालिकेच्या स्लज डिवॉटरींग (१७), फायरेक्स टँकर (७), सूक्ष्मजल फवारणी यंत्र (५) मिस्ट ब्लोविग यांचादेखील वापर केला जात आहे. या कार्यवाहीसाठी विविध पुनर्वापर प्रक्रियेद्वारे उपलब्ध तसेच स्थानिक जलस्रोत जसे की तलाव, विहिरी, कूपनलिका यामधून उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

एका दिवसात ५५ किमी लांब रस्त्यांवर पाण्याचा मारा

मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी एकूण ४५ किलोमीटर तर शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी एकूण ५५ किलोमीटर परिक्षेत्रात पाणी फवारणी करण्यात आली होती. आज रविवार ५ नोव्हेंबर रोजी ५४ किलोमीटर लांबीच्या परिक्षेत्रात पाणी फवारणी करण्यात आली आहे. म्हणजेच तीन दिवसात सुमारे १५४ किलोमीटर अंतराचे रस्ते धूळ मुक्त करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in