पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार

पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर केला जात आहे. आतापर्यंत २४ वॉर्डात १,३२५ मेट्रिक टन कोल्ड मिक्सचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी तीन हजार मेट्रिक टन कोल्ड मिक्स तयार करण्याचे नियोजन केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

पावसाळापूर्व नालेसफाई, रस्त्यांचा विकास, पुलांची दुरुस्ती अशी विविध कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. वरुणराजाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक असल्याने मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी विविध कामे प्रगतिपथावर आहेत; मात्र पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्स उपयुक्त ठरते. सुरुवातीला परदेशातून आणले जाणारे ‘कोल्ड मिक्स’ आता पालिकेच्या वरळी येथील प्लांटमध्ये बनवले जात आहे. पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी २४ वॉर्डकडून ३०९९ मेट्रिक टन ‘कोल्ड मिक्स’ची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार सुमारे ७० टक्के कोल्ड मिक्सचे वितरण पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पावसाळ्यात मागणीनुसार व वॉर्डच्या साठवणूक क्षमतेनुसार याचे वितरण करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in