रुची सोयाचा मार्च तिमाहीचे निकाल जाहीर

रुची सोयाचा मार्च तिमाहीचे निकाल जाहीर

रुची सोयाने शुक्रवारी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर २५.४ टक्क्यांनी घट झाली आहे. रुची सोयाचा करानंतरचा स्वतंत्र नफा (पीएटी) या तिमाहीत रु. २३४.४३ कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु.३१४.३३ कोटी होता. रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२२साठी त्याच्या पहिल्या लाभांशाची (रु. ५ प्रति शेअर) शिफारस केली आहे.

कंपनीने मुंबई शेअर बाजारात दाखल केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, महसूल ३७.७२ टक्के वाढून रु. ६,६६३.७२ कोटी झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत रु ४,८३८.५ कोटी होता. तिमाहीसाठी एबिटा ६.२७ टक्क्यांच्या एबिटा मार्जिनसह ४,१८.५५ कोटी रुपये होता. कंपनीने या तिमाहीत ७४.६५ कोटी रुपयांची निर्यात केल्याचे सांगितले. डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत खाद्य उत्पादन विभागाच्या विक्रीत १५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२मध्ये ८०६.३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ६८०.७७ कोटी रुपये होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in