डॉलरच्या तुलनेत पुन्हा एकदा रुपया घसरला

अखेरच्या सत्रातील डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी घसरुन ७८.१३ ही नीचांकी पातळी गाठली
डॉलरच्या तुलनेत पुन्हा एकदा रुपया घसरला

सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, भारतीय चलन रुपयाने पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली. बाजार सुरू होताच रुपया ७८.११ च्या पातळीवर उघडला होता. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत तो आणखी २९ पैशांनी घसरला आणि पहिल्यांदा ७८चा स्तर ओलांडला होता. तथापि, दिवसअखेरीस त्यात थोडीही सुधारणा होऊन मागील आठवड्यातील अखेरच्या सत्रातील डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी घसरुन ७८.१३ ही नीचांकी पातळी गाठली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा आणि वाढती महागाई याचा रुपयावरही होणारा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. आयात महाग होत आहे. कंपन्यांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे या कंपन्यांना वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतील, ज्यामुळे देशांतर्गत मागणीवर परिणाम होईल. सरकारची वित्तीय तूटही वाढू शकते. रुपयाच्या कमकुवतपणाचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांवर होतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in