BMC च्या कामांवर 'सचेत' ॲपची नजर; घनकचरा व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्ती आदींचा आढावा 

मुंबई महापालिकेकडून केले जाणारे कचरा व्यवस्थापन, विभाग स्तरावरील क्षेत्रीय कामे तसेच इमारती आणि कारखान्यांशी संबंधित कामकाजावर यापुढे महापालिका सचेत या मोबाईल ॲपद्वारे नजर ठेवणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेकडून केले जाणारे कचरा व्यवस्थापन, विभाग स्तरावरील क्षेत्रीय कामे तसेच इमारती आणि कारखान्यांशी संबंधित कामकाजावर यापुढे महापालिका सचेत या मोबाईल ॲपद्वारे नजर ठेवणार आहे. ते जीपीएस प्रणालीवर आधारित आहे.  सध्या हे माय बीएमसी सचेत ॲप्लिकेशन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ते पूर्णवेळ काम करणार आहे.

असा होईल उपयोग 

वेगवेगळ्या विभाग (वॉर्ड) स्तरावरील देखभाल-दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन, इमारती आणि कारखाना विभागाच्या कामकाजांशी संबंधित कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या दैनंदिन कामकाजांचा तपशील छायाचित्रांसह नोंदवू शकतील. काम पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधित माहिती आणि छायाचित्रे अपलोड करून काम पूर्ण झाल्याची नोंद देखील करू शकतील. त्यामुळे, त्यांच्याकडे सुरू असलेले काम, त्यांनी पूर्ण केलेले काम आणि कामाची सद्यस्थिती आदींची माहिती क्षणार्धात उपलब्ध होऊ शकेल. 

संबंधित विभागाचे सहायक आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त हे वेब अॅप्लिकेशन आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून या संपूर्ण माहितीचा आणि कामकाजाचा आढावा घेऊ शकतील. 

logo
marathi.freepressjournal.in