संभाजीराजे यांनी तातडीने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

संभाजीराजे यांनी तातडीने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा उमेदवारीसाठी पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, या शिवसेनेच्या घोषणेनेनंतर संभाजीराजे यांनी गुरुवारी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या निवास्थानी भेट घेतली.

संभाजीराजे हे राज्यसभेवर अपक्ष खासदार म्हणून जाण्यासाठी इच्छूक असून त्यासाठी ते मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यासाठी ते विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. संभाजीराजे यांना शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असेल, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी केले होते. त्यानंतर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची घेतलेली भेट यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. भेटीच्या तपशीलाबाबत संभाजीरराजे यांनी बोलण्यास नकार दिला असला तरी, शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठीच ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in