राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार,संजय राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभा निवडणुकीसाठी संजय पवार,संजय राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे.

शिवसेनेने दुसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे संभाजीराजे छत्रपतींची अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची आशा मावळल्याची चिन्हे दिसत आहेत. संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती व महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, संभाजीराजेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. पण त्यास संभाजीराजेंनी नकार दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in