
एप्रिल महिन्यात सरसकट शाळा सुरू न ठेवता, ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, अशा शाळाच एप्रिलमध्ये सुरू राहतील, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्तांनी दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिलअखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता ११वीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली होती; मात्र यावर शिक्षण आयुक्तांनी नव्याने स्पष्टीकरण दिले आहे. अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू राहणार आहेत.