प्रभाग निहाय आरक्षणावर शिक्कामोर्तब; अधिसूचना केल्या प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली
प्रभाग निहाय आरक्षणावर शिक्कामोर्तब; अधिसूचना केल्या प्रसिद्ध

३१ मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सोमवारी प्रभाग निहाय आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली. यावर १ ते ६ जूनपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या. या कालावधीत २३२ सूचना-हरकती प्राप्त झाल्या. त्यांना पालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला. आयोगाने अंतिम प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करून सोमवारी राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता निवडणुकीबाबतची पुढील प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित ठेवले जाणार आहेत. त्या पैकी ८ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित आहेत. त्यापैकी एक प्रभाग महिला आरक्षित आहे. तसेच २१९ प्रभाग खुल्या वर्गासाठी ठेवण्यात येणार आहेत त्या पैकी १०९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in