भारतीय शेअर बाजरात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ

दिवसभरात तो १०९७.९ अंक किंवा १.९६ टक्के वाढून ५६,९१४.२२ या कमाल पातळीवर गेला होता
 भारतीय शेअर बाजरात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ

जागतिक बाजारातील संमिश्र वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजरात सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी जवळपास दोन टक्के वाढले. सेन्सेक्सने १,०४१.४७ अंकांनी उसळी घेतली. बजाज फायनान्सह आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. भारतीय शेअर बाजार दोन महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर बुधवारी बंद झाला. सेन्सेक्स १,०४१.४७ अंकांनी वाढून ५६,८५७.७९ वर बंद झाला.

सेन्सेक्स १०४१.४७ अंक किंवा १.८७ टक्के वधारुन ५६,८५७.७९ वर बंद झाला. दिवसभरात तो १०९७.९ अंक किंवा १.९६ टक्के वाढून ५६,९१४.२२ या कमाल पातळीवर गेला होता. अशाच प्रकारे तर निफ्टी २८७.८० अंकांनी किंवा १.७३ टक्क्यांनी वाढून १६,९२९.६०वर बंद झाला.

बजाज फायनान्सचा समभाग सर्वाधिक १०.६८ टक्के वधारला. तर त्यानंतर बजाज फिनसर्वचा १०.१४ टक्के वाढला. जून तिमाहीतील दमदार कामगिरीने दोन्ही कंपन्यांच्या समभागाने उसळी घेतली. सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, इंडस‌्इंड बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि नेस्ले यांच्या समभागातही वाढ झाली. तर भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज, आयटीसी आणि सन फार्मा यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि टोकियोमध्ये सकारात्मक तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत घसरण तर अमेरिकेन बाजारात बुधवारी वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.३६ टक्के वाढ होऊन प्रति बॅरलचा भाव १०८.१ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुधवारी ४३६.८१ कोटींच्या समभागांची विक्री केली.

जूनच्या नीचांकीपासून पुन:प्राप्ती

रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष आणि संशोधक अजित मिश्रा म्हणाले की, भारतीय बाजारात जूनमध्ये खालच्या पातळीवरून रिकव्हरी सहन केली. ऑटो आणि जीएमसीजी सारख्या क्षेत्रांमध्ये चांगली वाढ झालेली आहे. पुढे, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र बाजाराला गती देऊ शकतात. मात्र, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रासारख्या क्षेत्रांवर दबाव आहे. अशा स्थितीत बाजार घसरल्यावर मोठ्या प्रमाणात दर्जेदार शेअर्स जोडणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in