शेअर बाजारात सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांवर; ३२२ अंकांनी वधारला

भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी मजबूत होऊन ७९.५५ झाला
 शेअर बाजारात सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांवर; ३२२ अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्स ३२२ अंकांनी वधारुन पुन्हा ६० हजारांवर गेला आहे. जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण असल्याने बँका, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून सुरु असलेली खरेदी, कच्च्या तेलाचे दर ९३अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलवर गेल्याने बाजारात तेजी परतली. जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचाही बाजाराला लाभ झाला. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २ पैशांनी मजबूत होऊन ७९.५५ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३२१.९९ अंक किंवा ०.५४ टक्का वाढ होऊन तीन आठवड्यांच्या उच्चांकावर जात ६०,११५.१३वर बंद झाला. ३०पैकी २१ कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स ६०,२८४.५५ ही कमाल पातळी गाठली होती तर ५९,९१२.२९ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १०३ अंक किंवा ०.५८ टक्का वधारुन १७,९३६.३५वर बंद झाला. एकूण ५० पैकी ३६ कंपन्यांच्या समभागात वाढ झाली.

सेन्सेक्सवर्गवारीत टायटनचा समभाग सर्वाधिक २.३९ टक्के वधारला. तर त्यानंतर ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा आणि टाटा स्टील यांच्या समभागात वाढ झाली. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लि., टीसीएस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि एल अॅण्ड टी वधारल्याने बाजारात तेजी होण्यास मदत झाली. तसेच एचडीएफसीचा समभाग ०.४३ टक्का तर एचडीएफसी बँक आणि नेस्लेच्या समभागातही घसरण झाली.

आशियाई बाजाराला सोमवारी सुट्टी होती. तर अमेरिकन फ्यूचर्समध्ये वाढ झाली आणि तेलाच्या दरातही तेजी राहिली. टोकियोचा निक्केई २२५ने वधारला. शांघाय, सेऊल बाजाराला सुट्टी होती. ब्रेंट क्रूड २८ सेंटस‌्ने वाढ होऊन प्रति बॅरलचा दर ९३.१२ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी २,१३२.४२ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in