भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स वधारला

सेन्सेक्स ४३३.३० अंक किंवा ०.८२ टक्का वाढून ५३,१६१.२८ वर बंद झाला असून १० जून नंतरची पातळी गाठली आहे
भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स वधारला

महागाईचा मिळणाऱ्या दिलासा लक्षात घेता जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स ४३३ अंकांनी वधारला. सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्के वाढला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४३३.३० अंक किंवा ०.८२ टक्का वाढून ५३,१६१.२८ वर बंद झाला असून १० जून नंतरची पातळी गाठली आहे. दिवसभरात निर्देशांक ७८१.५२ अंकांनी उसळी घेऊन ५३,५०९.५० ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीही १३२.८० अंक किंवा ०.८० टक्का भर पडून १५,८००ची पातळी ओलांडत १५,८३२.०५ वर बंद झाला असून १० जून नंतरची पातळी गाठली आहे.

तीन दिवसांच्या तेजीत सेन्सेक्स २.५६ टक्के किंवा १,३७८ अंकांनी आणि निफ्टी २.७३ टक्के किंवा ४१८ अंकांनी वाढला असून दोन आठवड्यांपेक्षा जास्तचा उच्चांक आहे.

सेन्सेक्सवर्गवारीत एल ॲण्ड टीचा समभाग सर्वाधिक २.६९ टक्के वधारला. तर त्यानंतर टेक महिंद्रा, २.६७ टक्के, एचसीएल टेक २.६१ टक्के, इंडस‌्इंड बँक २.२७ टक्के आणि इन्फोसिस २.२५ टक्के वाढला. तसेच एशियन पेंट‌स‌् २.१९ टक्के, भारती एअरटेल २ टक्के, टाटा स्टील १.७५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.७४ टक्के, एसबीआय १.५१ टक्के, आयटीसी १.५ टक्के आणि सन फार्मा १.४४ टक्के वधारला. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक आणि टायटनच्या समभागात घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.१३ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ११२.९३ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात २,३५३.७७ कोटींच्या समभागांची विक्री केली.

एक पैशाने घसरुन रुपयाचा नवा नीचांक

भारतीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया एक पैशाने घसरुन ७८.३४ झाला. क्रूड तेलाचे वाढते दर आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचे सुरु असल्याने रुपयावर अद्याप दबाव आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in