आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

गुन्ह्यांत आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे
आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच ५३ वर्षांच्या आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तक्रारदार महिला ही तिच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत जोगेश्‍वरीतील मेघवाडी परिसरात राहत असून, तिच्या पोटमाळ्यावर आरोपी राहतो. दोन्ही कुटुंबीय एकमेकांच्या चांगल्या परिचित आहेत. कामानिमित्त बाहेर जात असल्याने ती तिच्या मुलीला आरोपीच्या घरी ठेवत होती. रविवारी या मुलीने तिच्या आईला आरोपी तिच्याशी अश्‍लील चाळे करत असल्याचे सांगितले होते. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने मेघवाडी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा प्रकार ७ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत झाल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in