मुंबई : नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शाडूच्या मातीच्या देवीच्या मूर्ती साकारण्यासाठी शाडूची माती उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. गुजरातमधून शाडूची माती उपलब्ध करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून देवीच्या मूर्ती याआधीच साकारण्यात आल्याने आता शाडूच्या मातीचे काय करणार, असा सवाल मूर्तिकारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा केला, त्याचप्रमाणे नवरात्रौत्सव साजरा करत आरोग्यदायी उपक्रम राबवा, असे आवाहन नवरात्रोत्सव मंडळांना पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते, त्याचप्रमाणे नवरात्रौत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पर्यावरणपूरक नवरात्रौत्सव साजरा करा, असे आवाहन करत मूर्तिकारांना देवीच्या मूर्ती साकारण्यासाठी शाडूची माती उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी गुजरातमधून शाडूची माती आणण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र नवरात्रौत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून भव्यदिव्य देवीच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शाडूची माती घेऊन काय करणार, असा सवाल मूर्तिकारांनी उपस्थित केला आहे.
गणेशोत्सवात ४५० मेट्रिक टन शाडूची माती उपलब्ध केली होती. नवरात्रौत्सवातही मूर्तिकारांची मागणी असेल, त्याप्रमाणे माती उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वय समितीच्या रमाकांत बिरादार यांनी दिली. दरम्यान, नवरात्रौत्सवात सामाजिक उपक्रम, आरोग्यदायी उपक्रम, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने नवरात्रौत्सव मंडळांना केले आहे.
असा असणार देवीचा आगमन सोहळा!
७ ऑक्टोबर २०२३
विठ्ठल प्लाझाची आई माऊली
८ ऑक्टोबर
मुंबईची माऊली (सायन), साकीनाक्याची जगदंबा, विक्रोळीची अंबेमाता,
अंधेरीची नवदुर्गा, भांडुपची आई, असल्फाची माताराणी (घाटकोपर),
अंधेरीची माऊली अंधेरी पूर्व (गुंदवली)
१२ ऑक्टोबर २०२३
कोपरखैरणेची आईभवानी, मालपा डोंगरीची राजमाता (अंधेरी पूर्व),
माझंगावची आईभवानी
१३ ऑक्टोबर
गुंदवलीची राजमाता, अंधेरीची जगदंबा, मुंबईची महिषासुरमर्दिनी,
डोंबिवलीची आई माऊली (नमस्कार मित्र मंडळ), घाटकोपरची अंबामाता, डोंबिवलीची आईभवानी (अचानक ग्रुप) डोंबिवली पूर्व, वरळी क्रीडा मंडळाची आई जगदंबा, नाहूरची जगदंबा (नाहूर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ)
१४ ऑक्टोबर
विक्रोळीची दुर्गामाता, सायनची आईमाऊली, त्रिमूर्ती नवरात्रौत्सव मंडळ, भंडारवाड्याची माऊली, भटवाडीची आई जगदंबा, मरोळ पाईपलाईनची अंबेमाता, भायखळ्याची भवानीमाता, नाहूरची आई माऊली, फोर्टची ईच्छा माँ, भाईंदरची आईभवानी, लालडोंगरची आई जगदंबा, मानखूर्दची आई, असल्फाची आदिशक्ती, भटवाडी हिल नवरात्र उत्सव मंडळ, अखिल गावदेवी शरदोत्सव समिती, जोगेश्वरीची आई जगदंबा (जोगेश्वरी-पश्चिम), सहकार नगरची माऊली वडाळा, आई माझी बकरी अड्ड्याची, कानजी खेतशी चाळ नवरात्र उत्सव मंडळ गिरगाव, सातरस्त्याची भवानीमाता (श्री राम भक्त सेवा मंडळ), कोळ्यांची माऊली (कुलाबा), गावठाणची अंबेमाता (चेंबूर), भोयवाडीची माऊली (कुर्ला), शिवशक्ती नगरची आई (अंधेरी), शिवडीची आईशरण्ये, विक्रोळीची नारायणी, श्री संजय गडेकर नवरात्रौत्सव भांडुप, उत्कर्षची आईमाऊली भांडुप, शिवाजी नगरची आई (वांद्रे, पूर्व), वांद्राची आई भवानी (वांद्रे, पूर्व), मुंबईची आई काळाचौकी
१५ ऑक्टोबर
काजूपाड्याची आईभवानी, जरीमरीची आईभवानी, भांडुपची जिवदानी, गोरेगावची आईमाऊली, माझी आई माऊली, देसाई भटवाडीची आई माऊली, सुभाष नगरची राजमाता, बोरीवलीची आईमाऊली, प्रतिज्ञाची आई माऊली, भांडुपची माऊली (नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ), सत्वाची माऊली (सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भंडारी चाळ शिवडी), हरिनगरची राजमाता जोगेश्वरी (पूर्व), खंबादेव उत्कर्ष मंडळ धारावीची कुलस्वामिनी, सायनची आई भवानी, गोराईची माऊली, गोराईची आई.