देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर काय म्हणाले शरद पवार?

देवेंद्र फडणवीस यांनी 'पहाटेच्या शपथविधीचा अर्धीच गोष्ट सांगितली' असं म्हंटले होते, त्यावर शरद पवारांनी दिले उत्तर
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर काय म्हणाले शरद पवार?

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितली आहे" असे विधान केले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत की, "मला देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर भाष्य करून त्यांचे आणखी महत्त्व वाढवावे असे वाटत नाही. त्यांनी इतक्या दिवसांनी यावर विधान का केले? हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले.

गेले काही दिवस शरद पवार हे कसबा पोटनिवडणुकीनिमित्त मेळावा घेणार अशी चर्चा रंगली होती. याबद्दल त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, "उमेदवारांनी मला भेटून एखादी चक्कर टाका, असे सांगतिले. त्यावर विचार करू, पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी गेलो की, कसब्यातही जावे लागेल. एका ठिकाणी गेलो तर दोन्ही ठिकाणी जावे लागते." असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेहच पुढे ते म्हणाले की, "गिरीश बापट यांना खरंच प्रचारात आणण्याची गरज होती का? हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नसून त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in