एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली

एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण होत असल्याने कोटयवधी गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअरने सोमवारी घसरण कायम ठेवली आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी एलआयसीचा शेअर ८२६.१५ रुपयांपर्यंत घसरला. दिवसभरात तो ८५२.१० रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना किंचीत दिलासा मिळत असल्याचे जाणवत होते. मात्र, या समभागाला तेजी सांभाळता आली नाही. तो ८०४ रुपयांपर्यंत घसरला.दिवसाखेर हा शेअर १.३७ टक्क्याने घसरून ८१४.८० रुपयांवर बंद झाला आहे. एलआयसीच्या समभागाची किंमत ८०० रुपयांच्या खाली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. एलआयसीने गेल्याच आठवड्यात शेअर बाजारात प्रवेश केला होता. एलआयसीने २१ हजार कोटींचे भांडवल उभारले होते. केंद्र सरकारची १०० टक्के मालकी असलेल्या एलआयसीमधील ३.५ टक्के हिश्श्याची विक्री केली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in